विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं श्रेय हे शिक्षकांना जाते – महापौर

शहराच्या विकासामध्ये महापालिका शाळांचं मोलाचं योगदान असून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं श्रेय हे याच शिक्षकांना जाते असं प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं किसननगर येथील शाळा क्रमांक २३ इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन महापौरांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी घडवण्याचं काम ख-या अर्थानं शिक्षकच करत असतात. आम्ही लोकप्रतिनिधी त्याचे केवळ श्रेय घेतो असं त्यांनी सांगितलं. शिक्षकांच्या अपार मेहनतीने घडलेले महापालिका शाळातील विद्यार्थी समाजात उत्तम व्यक्ती म्हणून वावरत असून विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगून महापौरांनी याचं श्रेय शिक्षकांना जातं असं सांगितलं. पोषण आहाराबाबत महापालिका शाळातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पाची निवड राज्यस्तरावर झाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चमूचे आणि त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचेही महापौरांनी कौतुक केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading