आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखला पहिल्या सार्क आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्णपदक

ठाण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखनं बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या पहिल्या सार्क आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. या यशाबद्दल नुबैरशाहला सुवर्णपदकासह साडेतीन हजार डॉलर्सचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ८ देशांच्या ८८ बुध्दीबळ पटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरं मानांकन मिळालं होतं. या स्पर्धेत बांगलादेशचा ग्रँडमास्टर आणि या स्पर्धेतील अव्वल मानांकीत जिया ऊर रहेमानशी नुबैरशाहचा सामना झाला. या सामन्यात नुबैरशाहला काळ्या मोह-यांनी डावाची सुरूवात करावी लागली. त्यात त्याने सिसिलियन बचाव पध्दत अवलंबित रहेमानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. नुबैरशाहनं त्यानंतर ॲड्रफ व्हेरिएशन आणि थ्रेफॉल व्हेरिएशन स्थिती तयार करत विजेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवण्यासाठी आवश्यक असलेला गुण निश्चित करत सामना बरोबरीत राखला आणि आपल्या खात्यात १८वे आंतरराष्ट्रीय पदक जमा केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading