ठाण्यातील पहिला विज्ञान कट्टा येत्या शनिवारपासून ब्रह्मांड येथे

ठाण्यातील पहिल्या विज्ञान कट्ट्याची सुरूवात येत्या शनिवारी ब्रह्मांड येथे महापौरांच्या हस्ते होणार आहे. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरामध्ये असे विज्ञान कट्ट्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. विज्ञान कार्यक्रम पाहताना किंवा वृत्तपत्रातील विज्ञान विषयक लेख वाचताना वाचकांना प्रश्न विचारता येत नाहीत. त्यांच्या मनातील प्रश्न तसेच अनुत्तरीत राहतात. विज्ञान कट्ट्यावर विविध विषयातील माहिती अनौपचारिक पध्दतीनं दिली जाणार असून जनसामान्यांच्या मनातील प्रश्नांनाही उत्तरं दिली जाणार आहेत. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मराठीतून करण्याचे मराठी विज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक विषयातील तज्ञ आणून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. येत्या शनिवारपासून सुरू होणारा विज्ञान कट्टा ब्रह्मांड फेज २ येथे होणार असून येत्या २६ डिसेंबरला भारतातून दिसणा-या सूर्यग्रहणावर संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्रहणाविषयक समजांवरही वैज्ञानिक माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही दा. कृ. सोमण यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading