स वि कुलकर्णी गौरव व्याख्यानमाला १३ आणि १४ डिसेंबरला

ठाण्यामध्ये स वि कुलकर्णी गौरव व्याख्यानमाला १३ आणि १४ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुहास नाईक-साटम यांचं चंद्रयान २ या विषयावर तर शनिवार १४ डिसेंबरला श्रीगौरी सावंत या मला काही सांगायचं आहे या विषयावर गप्पा मारणार आहेत. स वि कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महापौर नरेश म्हस्के यांचाही महापौर झाल्याबद्दल सत्कार केला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading