इंडियन स्टार जातीच्या कासवांसह विविध प्रजातींचे पक्षी मुंबईत विक्रीसाठी आलेल्यास अटक

इंडियन स्टार जातीच्या कासवांसह विविध प्रजातींचे पक्षी बंगलोर येथून रेल्वेनं मुंबईत विक्रीसाठी आलेल्या महम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायद खान याला वन विभागानं ठाणे रेल्वे स्थानकात ताब्यात घेतलं. कोईम्बतूर-कुर्ला रेल्वेनं एक जण वन्यजीव आणि पक्षी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार काल ठाणे रेल्वे स्थानकात वन विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून रेल्वेच्या एस-१ या बोगीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये पुठ्ठ्याच्या तीन खोक्यात विविध प्रजातींचे पक्षी आणि स्टार कासव मिळाले. हे वन्यजीव वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित वन्यजीव आहेत. त्यांची खरेदी, विक्री, बाळगणे, पाळणे यावर बंदी आहे. जायद खानने हे वन्यजीव मुंबईत विक्रीसाठी आणले होते. हे वन्यजीव बंगलोर इथून खरेदी केल्याचं जायद खान सांगत असून त्याचे आणखी काही साथीदार देखील यामध्ये सहभागी असण्याची शक्यता उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading