पंडीत राम मराठे स्मृती समारोहात उद्या पंडीत वसंतराव देशपांडे यांचा सांगितीक प्रवास

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात उद्या पंडीत वसंतराव देशपांडे यांचा सांगितीक प्रवास उलगडला जाणार आहे. समारोहाच्या तिस-या दिवशी म्हणजे उद्या रविवारी पंडीत वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत वैभव या विशेष कार्यक्रमातून पंडीत विजय कोपरकर, पंडीत सुरेश बापट हे वसंतराव देशपांडे यांच्या वैभवशाली संगीताचा प्रवास उलगडणार आहेत. तर शेवटच्या सत्रात प्रख्यात गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनानं समारोहाचा समारोप होणार आहे. उद्या संध्याकाळी ६ वाजताच्या सत्रात स्वरांगी आणि प्राजक्ता मराठे यांचं सहगायन होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading