परिवहन आगारातील डिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

परिवहन आगारातील डिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परिवहन सेवेच्या आनंदनगर आणि मुल्लाबाग येथील बस आगारांमध्ये डिझेल चोरी होत असल्याचं समोर आलं होतं. या पुरवठादारांकडून गेली २ वर्ष डिझेलचा पुरवठा होत असल्यामुळं यामध्ये लाखो रूपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असला तरी खोलात जाऊन चौकशी होणं गरजेचं आहे. या डिझेल चोरीची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी झाल्यास घोटाळ्याची पाळंमुळं खोदून दोषींना शिक्षा देता येईल असं मत व्यक्त करून नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading