आंध्रप्रदेश येथे प्रियंका रेड्डी या तरूणीवर अमानुष बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेचा विविध संघटनांच्या वतीनं निषेध

आंध्रप्रदेश येथे प्रियंका रेड्डी या तरूणीवर अमानुष बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेचा विविध संघटनांच्या वतीनं निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. शासकीय विश्रामगृह येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आला. या मेणबत्ती मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी झाले होते. प्रियंकाच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी तसंच आरोपीचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फेही हँग द रेपिस्ट अशी मागणी करत निदर्शनं करण्यात आली. जिजाऊ उद्यान परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका रेड्डीवरील सामुहिक बलात्कार आणि हत्येचा निषेध केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading