येत्या सोमवारी ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन

ठाणे महापालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या सोमवारी ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठांचा सन्मान केला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. यावर्षी येत्या सोमवारी म्हणजे २ डिसेंबरला ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading