प्लास्टीकविरोधात केलेल्या कडक कारवाईत ५२ किलो प्लास्टीक जप्त – २० हजारांचा दंड वसूल

ठाणे महापालिकेनं नौपाडा, कोपरी प्रभाग समितीमध्ये प्लास्टीकविरोधात केलेल्या कडक कारवाईत ५२ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आलं असून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीनं प्रभाग समिती कार्यालयामध्ये प्लास्टीक संकलन केंद्र तसंच प्लास्टीक संकलन वाहनाच्या माध्यमातून प्लास्टीक संकलन करण्यात येत असून ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केला आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि घनकचरा विभागानं नौपाडा, कोपरी प्रभाग समितीमध्ये कारवाई केली आणि हॉटेल्स, दुकानदार आणि विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ५२ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आलं असून २० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading