ठाण्यातील पुरूष आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचं एका सर्वेक्षणात समोर

ठाण्यातील पुरूष आपल्या आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. डीजी ठाणे आणि ज्युपिटर हॉस्पिटलने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे. ठाणे स्मार्ट सिटी आणि ज्युपिटर हॉस्पीटलने कुटुंबातील मुख्य कमावणा-या सदस्यांचं याबाबत सर्वेक्षण केलं. यामध्ये ७० टक्के सहभागींना आपल्या आरोग्याची नियमित तपासणी आणि डॉक्टरांना भेटणे गरजेचं वाटत नाही असं समोर आलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलनं नोव्हेंबर महिना हा मोवेम्बर म्हणून साजरा केला. मोवेम्बर ही पुरूषांच्या आरोग्यावरील एक जागतिक मोहिम आहे. या मोहिमेत पुरूष आपली मिशी वाढवून पुरूषांच्या आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करतात. ज्युपिटर हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स आणि स्टाफनं आपली मिशी वाढवून रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पुरूषांमध्ये होणा-या आजारांविषयी मार्गदर्शन केलं. खाजगी नोकरी करणारे स्वत:साठी खूप कमी वेळ समर्पित करतात. ६० टक्के पुरूष आपले मित्र आणि कुटुंबियांना कमीत कमी वेळ देतात असं या सर्वेक्षणात लक्षात आलं. ३० टक्क्यांपेक्षा अधिक पुरूषांना आपले छंद पाळणं अशक्य असल्याचं दिसून आलं. ४० टक्के पुरूष प्रवास करताना सोशल मिडिया चेक करतात तर ७५ टक्के पुरूषांनी स्वत:साठी वेळ देता येत नाही असं मत व्यक्त केलं. मोवेम्बरच्या अंतर्गत ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर्स शहरातील पुरूषांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहीत करणार असून १ डिसेंबर रोजी डॉक्टर्स आणि स्टाफ वॉक फॉर मेन्स हेल्थ या निरनिराळ्या वॉकथॉनमध्ये भाग घेऊन आरोग्य उत्तम राखण्यासाठी सल्ला देणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading