शेल्टर असोसिएट या सामाजिक संस्थेनं केला शहरातील २८ वस्त्यांमधील ४० हजार कुटुंबांचा सर्व्हे

शेल्टर असोसिएट या सामाजिक संस्थेनं शहरातील २८ वस्त्यांमधील ४० हजार कुटुंबांचा सर्व्हे केला असून याचा वापर मुलभूत सेवा देण्यासाठी केला जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी शेल्टर असोसिएटच्या प्रतिमा जोशी यांच्याशी यावर चर्चा केली. या सर्व्हेतील माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून याचा उपयोग वस्त्यांमधील विकासकामांसाठी केला जाणार आहे. शेल्टर संस्थेनं ठाण्यात २ हजार वैयक्तीक शौचालयं बांधली आहेत. लोकांना घराघरातून शौचालयं बांधण्यासाठी तसंच कचरा व्यवस्थापन करण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जाणार आहे. जीआयएस आधारीत नकाशे कशाप्रकारे वापरले जातात आणि या माहितीचा उपयोग कसा करावा याचं प्रशिक्षण महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांना शेल्टर या संस्थेतर्फे दिलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading