एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना केलं अभिवादन

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्रीमंडळात शपथ घेतल्यानंतर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं. गेल्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या मंत्रीमंडळातही एकनाथ शिंदे यांना दुस-या क्रमांकाचं मंत्रीपद मिळालं आहे. काल शिवतीर्थावर शपथ घेतल्यानंतर रात्री उशीरा एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं तसंच टेंभीनाका येथील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जाऊन ते दिघे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. यावेळी पुन्हा मंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading