रात्रीच्या वेळी झाडं कापणा-यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे महापौरांचे आदेश

ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी न्यायालयाची स्थगिती असतानाही रात्रीच्या वेळी झाडं तोडणा-या ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. गेले दोन दिवस मेट्रो ४ प्रकल्पासाठी न्यायालयाची बंदी असतानाही अंधारात झाडाची कत्तल करण्यात आली. याबाबत विविध सामाजिक संघटनांनी महापौरांकडे तक्रारी केल्या. रात्रीच्या वेळी न्यायालयाची स्थगिती असतानाही वृक्षतोड करणं हे बेकायदेशीरच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनं चुकीचं असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. यामुळं महापालिकेचं नाव बदनाम होत असून महापालिकेच्या भूमिकेबाबतही गैरसमज निर्माण होत आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading