entertainment

सध्याच्या अत्याधुनिक जगात रेडिओचं महत्व आजही अबाधित

सध्याच्या अत्याधुनिक जमान्यात कोणतीही घटना डोळ्यासमोर घडल्याप्रमाणे पहायला मिळत असतानाही रेडीओ सारखं माध्यम आज चांगलंच तग धरून आहे. १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडीओ डे म्हणून साजरा केला जातो. रेडीओ हे जगात सर्वात सुलभ आणि परिणामकारक माध्यम आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातही रेडीओ पोहचला आहे. ज्यांच्यापर्यंत अक्षरं अद्याप पोहचलेली नाहीत, ज्यांना लिहिणं वाचणं माहित नाही असं जगाशी नातं जोडता न आलेल्या लोकांपर्यंतही रेडीओच्या माध्यमातून पोहचता येतं. रशियामध्ये जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या रेडीओ प्रसारण कंपन्या आहेत. मार्कोनिने १८९५ मध्ये पहिला रेडिओ संदेश पाठवला होता. भारतामध्ये १९२६ मध्ये रेडिओची सुरूवात झाली. त्यावेळी रेडिओचे संदेश प्रक्षेपण करणा-या केंद्राची क्षमता ४८ किलोमीटर अंतराच्या परिघात होती. १९३५ मध्ये रेडिओ केंद्राला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. सध्याच्या अत्याधुनिक जगात तर प्रसार माध्यमांचा खच पडला आहे. जगभरातील कोणतीही घटना अगदी काही क्षणात जशीच्या तशी पहायला मिळते. आज इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांना महत्व आलं असलं तरी रेडिओचा आवाज कमी झालेला नाही. खेड्यापाड्यातच नव्हे तर अगदी मुंबईसारख्या शहरातही नवनविन कल्पना वापरून रेडिओ तग धरून आहे. प्रवासामध्ये अनेकजण रेडिओ ऐकण्याचाच आनंद लुटतात. रेडिओची क्रेझ आजही इतकी आहे की देशाच्या पंतप्रधानांना त्यांची मन की बात ऐकवण्यासाठी रेडिओचाच मोह होतो. त्यामुळं रेडिओला अच्छे दिन आल्याचंच दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *