govt

कल्याण, ठाणे, मुंबई जलवाहतुकीसाठी बोटींबरोबरच अँफिबियस बसचाही वापर करण्याची नितीन गडकरी यांची सूचना

महापालिकेच्या महत्वाकांक्षी अशा कल्याण, ठाणे, मुंबई जलवाहतुकीसाठी बोटींबरोबरच जमिन तसंच पाण्यावर चालणा-या अँफिबियस बसचाही वापर करावा अशी सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्यासमोर या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी गडकरी यांनी ही सूचना केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी जेएनपीटी कडे असलेली अँफिबियस बस या जलवाहतूक प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. तर या जलवाहतूक आराखड्यात दिव्याचाही समावेश करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. या प्रकल्पासाठी रिव्हर ट्रॅफीक कंट्रोल यंत्रणेचा वापर करतानाच जेट्टीच्या ठिकाणी शॉपिंग आणि फुड कोर्ट विकसित करावा, स्थानिकांना रोजगार द्यावा अशा सूचनाही नितीन गडकरी यांनी यावेळी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *