court

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७४ जोडप्यांचे वैवाहिक वाद संपुष्टात तर २८ कामगार वादामध्ये तडजोड

ठाण्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७४ जोडप्यांचे वैवाहिक वाद संपुष्टात आले तर २८ कामगार वादामध्ये तडजोड झाली. ठाणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २ हजार ६५० दावे तडजोडीमध्ये निकालात निघाले. या दाव्यांपोटी साडे अकरा कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. या लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि दाखल अशी एकूण २३ हजार ७६१ प्रकरणं ७४ पॅनलसमोर तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी १५११ दाखलपूर्व प्रकरणात तडजोड झाली आणि १ कोटी ९९ लाख रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. ११३९ दाखल प्रकरणात तडजोड होऊन साडेनऊ कोटी रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. बँके संबंधी ३०१ दाखलपूर्व प्रकरणात यशस्वी तडजोड झाली. मोटार अपघात दावा प्राधिकरणात ९५ दाव्यांमध्ये ५ कोटी ३३ लाखांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. तर ५१५ फौजदारी दाव्यांमध्ये तडजोडीपोटी २ कोटी १५ लाखांची रक्कम मंजूर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *