Bjp political

प्रतिभा मढवी यांनी नगरसेवक म्हणून मिळणारं मानधन सिंधुताईंच्या आश्रमासाठी केलं दान

नगरसेवक म्हटलं की भ्रष्टाचार आणि टक्केवारी याचीच चर्चा ऐकायला मिळते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी याला छेद देत समाजऋण फेडून सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अनाथांच्या नाथ अर्थात सिंधूताई सपकाळ यांना त्यांनी आपले मानधन अर्पण केले आहे. माई एक कल्पवृक्षाची सावली या कार्यक्रमांतर्गत सिंधूताई सपकाळ यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सिंधूताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंगावर कशी मात केली याचं कथन केलं. त्यावेळी राजेश मढवी आणि प्रतिभा मढवी यांनी नगरसेवक म्हणून मिळणारं मानधन सिंधुताईंच्या आश्रमासाठी दान म्हणून सुपुर्द करून लोकप्रतिनिधींसमोर एक वेगळा आदर्श उभा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *