TMC

किशोर पवार यांच्या पत्नीला लवकरच महापालिकेत नोकरी

ठाणे महापालिकेत प्रिती पवार यांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात अंगावर झाड पडून मृत्यूमुखी पडलेल्या विधीज्ञ किशोर पवार यांच्या प्रिती पवार या पत्नी आहेत. अंगावर झाड पडून किशोर पवार यांचा मृत्यू झाल्यामुळं त्यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी मिळावी यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानानं आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनाला आता यश मिळालं असून सर्वसाधारण सभेत नोकरी देण्याचा ठरावही मंजूर झाला होता. आता पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रस्तावावर आपली मोहोर उमटवल्यामुळं प्रिती पवार यांना पालिकेत नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *