कॅनडियन ट्रेड कमिशनरची महापालिका अधिका-यांशी चर्चा

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी कॅनडियन ट्रेड कमिशनर अखिल त्यागी यांनी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेतली. यावेळी कॅनडामधील विविध कंपन्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांकरिता कसा करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येणा-या सर्व प्रकल्पांचे कॅनडियन ट्रेड कमिशनर तसंच कॅनडामधील विविध तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध तांत्रिक बाबी तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर सखोल चर्चा करण्यात आली. डीजी ठाणे या अत्याधुनिक डिजीटल प्रणाली, नवीन रेल्वे स्टेशन आणि सॅटीस पूर्व प्रकल्पांचे कॅनडाच्या प्रतिनिधींनी कौतुक केले. दरम्यान हजुरी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे प्रत्यक्ष भेट देऊन या सर्व प्रकल्पातील तंत्रज्ञानाची माहिती कंपन्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading