ठाणे शहराला फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचरामुक्त शहराचे मूल्यांकन होणार असून ठाणे शहराला फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेबाबत प्रत्येक विभागानं आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सर्व अधिका-यांना दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरात स्वच्छता मोहिम सुरू असून यामध्ये कोणत्या महत्वाच्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कच-याच्या वर्गीकरणाचं महत्व नागरिकांना पटवून देणं, शहरातील तलाव, नाले यामध्ये कचरा पडू नये, पडल्यास तो तात्काळ घनकचरा विभागाकडून साफ करण्यात यावा अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या. महापालिकेत सफाई कर्मचारी हा मुख्य घटक असून केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ पालिकेच्या सर्व सफाई कर्म-यांना देण्याकरिता तात्काळ प्रयत्न करून त्यांना लाभ मिळवून देण्यात यावेत अशा सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading