डोंबिवली टपाल कार्यालयामध्ये पारपत्र सेवा केंद्र कार्यान्वित करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

डोंबिवली टपाल कार्यालयामध्ये लवकरच पारपत्र सेवा केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केली आहे. डोंबिवली टपाल कार्यालयात पारपत्र सेवा सुरू करण्यात सरकारच्या निकषामुळे अडचण येत आहे. हा निकष शिथील करावा. डोंबिवली टपाल कार्यालयात २०० चौरस फूटाची जागा आहे. पारपत्र कार्यालयासाठी ३०० चौरस फूटाची जागा आवश्यक आहे. हे बांधकाम टपाल खात्यानं करावे किंवा खासदार निधीतून हे बांधकाम करण्याची तयारी शिंदे यांनी दाखवली आहे. त्याकरिता एकतर अनुमती द्यावी अथवा निकष बदलावे अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिवेशनामध्ये करून केंद्र सरकारचं याकडे लक्ष वेधलं आहे. यापूर्वीही याबाबत असलेली अडचण संसदेत मांडली आहे. पण अद्याप सहकार्य मिळालेलं नाही. त्यामुळं निकषामध्ये सूट देऊन डोंबिवली टपाल कार्यालयात पारपत्र केंद्र सुरू करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading