ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केली टाऊन हॉलची पाहणी

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी कोर्टनाका येथील टाऊन हॉलची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ए. पी. परदेशी तसंच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला टाऊन हॉल हा डंपिंग हॉल झाला होता. त्याचे आमदार संजय केळकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या सहकार्यानं नुतनीकरण केलं होतं. आता पुन्हा त्याच टाऊन हॉलचे ऐतिहासिक पध्दतीनं नुतनीकरण केलं जाणार आहे. या ठिकाणी ॲम्पी थिएटर आणि डोम उभारला जाणार असून आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून तसंच जिल्हा नियोजन निधीतून यासाठी तरतूद करण्यात आली आहे. ठाण्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांना विविध कार्यक्रमांसाठी अल्पदरात हा हॉल उपलब्ध होणार असून यामुळं सांस्कृतिक चळवळीस चालना मिळेल असं संजय केळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading