थीम पार्कच्या भ्रष्टाचारावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाचे वस्त्रहरण

थीम पार्कच्या भ्रष्टाचारावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाचे वस्त्रहरण झाले. थीम पार्कचा भ्रष्टाचार राष्ट्रवादी काँग्रेसनं उघड केला होता. त्यानंतर सर्वपक्षीयांच्या समितीनं या भ्रष्टाचारावर एक अहवाल तयार केला. मात्र भारतीय जनता पक्ष सदस्यांचे ड्राफ्ट तयार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान नसताना तो परस्पर फोडल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी केला. यावरून झालेल्या वादात राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधात भारतीय जनता पक्ष असं चित्र सभागृहात पहायला मिळालं. काल प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या विषयाला हात घातला. ज्यांनी हा भ्रष्टाचार उघड केला आणि ज्यांनी सर्व तांत्रिक मुद्यांचा अभ्यास करून मसुदा तयार केला ते सर्व राहिले बाजूला आणि ज्यांचे काही योगदान नाही ते या गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी समोर आल्याचा आरोप मुल्ला यांनी नारायण पवार यांच्यावर केला. मुल्ला यांनी यावर विविध प्रश्न उपस्थित करून भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न नारायण पवार यांनी केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. जी समिती यासाठी स्थापन करण्यात आली होती त्या समितीमधील प्रत्येक सदस्यांनी वैयक्तीक अहवाल सादर करण्याचं ठरलं असल्याचं पवार यांनी सांगितलं. त्याला मुल्ला यांनी आक्षेप घेतला. महापौरांनीही असा कोणताही विषय झाला नसल्याचं सांगितल्यावर नारायण पवार उघडे पडले. त्यानंतर हा अहवाल सर्वांना देण्याची मागणी नजीब मुल्ला आणि मिलिंद पाटणकर यांनी केल्यावर या वादावर पडदा पडला आणि अहवाल सभागृहात सादरच झाला नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading