राबोडी भागात एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून एक महिला गंभीर जखमी

राबोडी भागातील अमर सदन या इमारतीचा काही भाग कोसळल्यानं एक महिला गंभीर जखमी झाली आहे. राबोडीमध्ये अमर सदन ही तळ अधिक दोन मजली इमारत आहे. ही इमारत ४५ वर्ष जुनी असून या इमारतीत १६ सदनिका आहेत. पण ही इमारत धोकादायक झाल्यानं या इमारतीत ३ ते ४ रहिवासी वास्तव्याला होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील गॅलरीतून सुरैय्या शेख या जात असताना गॅलरीचा काही भाग कोसळला. यामध्ये सुरैय्या शेख खाली पडल्या आणि त्यांच्या पायाला तसंच पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना मुंबईला उपचारार्थ हलवण्यात आलं असून आता ही इमारत पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading