जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरूष गटात सोमजाई भजनी मंडळ तर महिलांच्या गटात अनुपम भजनी मंडळाला प्रथम क्रमांक

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरूष गटात सोमजाई भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात अनुपम भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील २० हून अधिक भजनी मंडळं या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत पुरूष गटात बदलापूरच्या श्रीगणेश प्रासादिक मंडळानं द्वितीय तर ठाण्यातील गणेश प्रासादिक मंडळानं तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात इंद्रायणी भजनी मंडळानं द्वितीय तर परमेश्वरी जानकी भजनी मंडळानं तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून ज्ञानेश्वरी घाडगे, पखवाजसाठी प्रवीण मोरे, तबल्यासाठी अक्षय वैद्य, उत्कृष्ट टाळ-झांज साठी इंद्रायणी भजनी मंडळ तर हार्मोनियमसाठी संतोष शितकर यांना गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading