नौपाडा पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यात केला ११ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

नौपाडा पोलीसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात शिताफीनं तपास करून ११ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घंटाळी येथे राहणा-या ज्योती विरा यांच्या घरातील ३६ तोळे वजनाचे १३ लाख ७९ हजारांचे दागिने चोरीला गेले होते. घरात चोरी झाल्याचं त्यांच्या बरंच उशिरा लक्षात आलं. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नौपाडा पोलीसांनी शिताफीनं तपास करून त्यांच्या घरात पूर्वी घरकाम करणा-या दिपाली सुगदरे हिला अटक केली. तिच्या चौकशीमध्ये चोरीला गेलेल्या ३६ तोळ्यांपैकी साडेअकरा लाख रूपयांचे ३३ तोळे दागिने हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading