पिंपळास येथील एका कंपनीतून ८८ लाखांची कॉस्मॅटिक्स जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील पिंपळास येथे विना परवाना ८८ लाखांचा कॉस्मॅटिकचा साठा जप्त करण्यात आला.अन्न आणि औषध प्रशासनाला पिंपळास येथील मेसर्स नायका रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आवारात हा ८८ लाखांचा साठा ठेवण्यात आला होता. अमेरिकेतील नेल्फ कंपनीची लिपस्टीक, जेल आय लाईनर, हायलायटर आणि इतर कॉस्मॅटिक उत्पादनं या छाप्यात जप्त करण्यात आली. ही उत्पादनं विरार मधील बेलेझा ईटालिया या कंपनीनं उत्पादित केली होती तर नेल्फ कॉस्मॅटिक प्रायव्हेट लिमिटेड मार्फत त्याचं मार्केटिंग केलं जात होतं. बेलेझा ईटालिया या कंपनीनं आपले परवाने परत केल्यानंतर कोणत्याही परवानगीशिवाय या कॉस्मॅटिकचं उत्पादन केलं जात होतं. त्यामुळं छापा टाकून हा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन पुढील तपास करत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading