ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अपहरण झालेल्या ८०० हून अधिक बालकांचा शोध लागलेला नाही

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जवळपास अपहरण झालेल्या ८०० हून अधिक बालकांचा शोध लागलेला नाही. ठाणे पोलीस आयुक्तालयात १३ नोव्हेंबर पर्यंत ८०३ बालकांचं अपहरण झालं यापैकी ५७० बालकांचा शोध लागू शकला. म्हणजे जवळपास २९ टक्के बालकांचा शोध अद्यापही लागू शकलेला नाही. बालदिनाच्या निमित्तानं पोलीसांतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये एकूण १ हजार ८२८ बालकांचं अपहरण झालं. यामध्ये १ हजार १९० मुली होत्या. पोलीसांतर्फे बालकांची सुरक्षा आणि त्यांचे हक्क यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन ठाणे पोलीस आयुक्तालयात करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading