रिक्षाचा अर्धवट क्रमांक आणि इतर कोणत्याही माहितीशिवाय ठाणे नगर पोलीसांनी दागिने शोधून केली उत्तम कामगिरी

रिक्षाचा अर्धवट क्रमांक आणि इतर कोणत्याही माहितीशिवाय ठाणे नगर पोलीसांनी दागिने शोधून उत्तम कामगिरी केली आहे. ४ नोव्हेंबरला हॅप्पी व्हॅली येथील आरती अवस्थी या रिक्षानं जिल्हा परिषद येथे आल्या होत्या. या प्रवासादरम्यान ४ तोळे सोन्याचे लॉकेट, चेन, साडेसात हजार रूपये रोख तसंच महत्वाची कागदपत्रं असलेली त्यांची पर्स गहाळ झाली होती. त्यांनी या प्रकरणी ठाणे नगर पोलीसांकडे तक्रार दाखल केली त्यावेळी क्लोज सर्किटे कॅमे-याद्वारे रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चित्रीकरणामध्ये रिक्षाचा अर्धवटच नंबर दिसत होता. अशा परिस्थितीतही ठाणे नगर पोलीसांनी १० दिवस रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि तो रिक्षा चालक पोलीसांच्या हाती लागला आणि अवस्थी यांना त्यांची पर्स पुन्हा मिळाली. त्यातील सर्व मुद्देमाल पर्समध्येच मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading