खाडी किनारी खारफुटी सफारी बांधकाम परवानगीसाठी जागतिक बँकेच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची पालिका आयुक्तांची सूचना

पर्यटनाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणा-या खाडी किनारी खारफुटी सफारी करणे, स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजिटायझेशन करणे तसंच शहर विकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शन नियमावलीची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. पुढील तीन महिन्यात शहरातील सार्वजनिक आणि सामुहिक शौचालयांचं अद्यावतीकरण करण्याला प्राधान्य देताना त्यासाठी समान कार्यपध्दती तयार करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. ईवाय या सल्लागार संस्थेमार्फत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी ट्रेलस सुरू करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विभागानं अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. मालमत्तांची वर्गवारी, त्यांची करण्यात आलेली कर आकारणी, त्याचा कालावधी आदी सर्व माहिती संकलित करून मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटायझेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. महापालिकेच्या शहर विकास विभागाच्या माध्यमातून बांधकामासाठी परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची कशी अंमलबजावणी करता येईल यासाठी ईवाय या संस्थेनं अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading