पणजी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत मारोतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरण पटूंना नेत्रदीपक यश

पणजी येथे कार्नाझेलम बीचवर झालेल्या ऑक्वामन नॅशनल ओपन वॉटर या जलतरण स्पर्धेत महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरण पटूंना नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. १० किलोमीटरच्या स्पर्धेत १७ ते २५ वयोगटात सोहम राजपूतनं चौथा क्रमांक पटकावला तर नितीन राजगौड यानं सहावा, सौरभ पणदिरकर यानं बारावा क्रमांक पटकावला. २६ ते ४० वयोगटात मल्हार कुलकर्णी यानं पाचवा क्रमांक पटकावला. ५ किलोमीटर स्पर्धेत १३ ते १६ वयोगटात स्वयम देसाई यानं चौदावा क्रमांक तर पवन कदम यानं विसावा क्रमांक पटकावला. ४० वर्षावरील गटात महापालिका कर्मचारी भरत मोरे यांनी चौथा क्रमांक पटकावला. २ किलोमीटरच्या स्पर्धेत १० ते १२ वयोगटात लष्कर मोरे यानं सातवा तर खुल्या गटात कुणाल रसाळ यानं विसावा क्रमांक पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading