गुंतवणुकीवर अधिक पडताळ्याचं आमिष दाखवून ७१ लोकांची १ कोटींची फसवणूक करणा-या टोळीला अटक

लोकांना कमी कालावधीत जास्त पैसे मिळण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या एका टोळीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या प्रकरणी केजीएल सिक्युरिटीचे हारून सत्तार, मुकेश मोरे, सलमान शेख, नबील सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे. केजीएल सिक्युरिटीजनं आपल्या योजनांचा व्हॉटस् ॲप ग्रुप बनवून गुंतवणूकदारांमार्फत प्रचार केला आणि विविध मासिक आणि मुदतठेवीच्या गुंतवणूकीवर आकर्षक व्याज देण्याचं आमिष दाखवून मनी सर्क्युलेशन स्कीम चालू केली. याद्वारे त्यांनी ७१ गुंतवणूकदारांची सुमारे १ कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading