बाळकूम साकेत खाडी किनारी होणा-या तिवरांच्या कत्तलीवर कारवाईची जिल्हाधिका-यांकडे मागणी

बाळकूम खाडीलगत असलेल्या कांदळवनातील झाडांची होणारी बेसुमार कत्तल आणि त्यावर घातला जात असलेला मातीचा भराव टाकणा-यांवर कारवाई करण्याची मागणी बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेनं जिल्हाधिका-यांकडे केली आहे. २५ सप्टेंबरला बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेनं बाळकूम खाडीलगत असलेल्या कांदळवनातील झाडांची जेसीबीनं कत्तल करून त्यावर मातीचा भराव टाकून तिवरांची झाडं नष्ट करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी तक्रार दिली होती. मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्यानं काल पुन्हा जिल्हाधिका-यांना याप्रश्नी निवेदन देण्यात आलं. कारवाई होण्याऐवजी उलट हे काम सर्रासपणे सुरू आहे. वन विभागाच्या अधिका-यांनी जागेवर येऊन पाहणी करूनही संबंधित ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. त्यामुळं या प्रकरणात लक्ष घालून संबंधित ठेकेदार आणि महापालिकेवर कारवाई करावी अशी मागणी बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेनं जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading