धावत्या मेलमध्ये चढत असताना घसरून पडलेल्या महिला प्रवाशाचे रेल्वे पोलीसांमुळे वाचले प्राण

धावत्या मेलमध्ये चढत असताना घसरून पडलेल्या महिला प्रवाशाचे प्राण रेल्वे पोलीसांमुळे वाचले आहेत. काल ठाणे रेल्वे स्थानकात ही घटना घडली. मेल आणि फलाटामध्ये असलेल्या पोकळीत अडकलेल्या या महिलेचे प्राण रेल्वे पोलीसांनी वाचवल्यानं त्यांचं कौतुक केलं जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ वर मुंबईच्या दिशेनं जाणारी रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर काल दुपारी ठाणे रेल्वे स्थानकात आली होती. या गाडीमध्ये या महिलेचे वडील आणि मुलगा आधीच चढले होते. त्यानंतर मागाहून गाडीत चढत असताना या महिलेचा तोल गेला आणि ती फलाट आणि गाडीच्या पोकळीत सापडली. त्याचवेळी रेल्वे पोलीस हवालदार ए. व्ही. सोनार फलाटावर गस्त घालत होते. त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या महिलेला फलाटावरून खेचून पोकळी बाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading