सर्वोच्च न्यायालयाच्या राम मंदिर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे ठाण्यात शांततेचं वातावरण पहायला मिळालं. ठाण्यामध्ये मंदिर, मशिद, राजकीय पक्षांची कार्यालयं, संवेदनशील ठिकाणं, स्टेशन, बस आगार अशी गर्दीची ठिकाणं अशा विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. ठाणे रेल्वे स्थानकावरही असाच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस त्याचबरोबर दंगल नियंत्रक पोलीस तैनात करण्यात आले होते. गर्दीचा फायदा उचलून कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये याकरिता ठिकठिकाणी ठाणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading