congresspolitical

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात शहर काँग्रेसतर्फे ठाणे रेल्वे स्थानकात आंदोलन

शहर काँग्रेसतर्फे आज ठाणे रेल्वे स्थानकात केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. केंद्र शासनाच्या विविध धोरणांमुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत असून त्याविरोधात देशभर काँग्रेसतर्फे आंदोलन छेडलं जात आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे ठाणे रेल्वे स्थानकात या धोरणांचा निषेध करण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली. पहेले शेतकरी फिर सरकार, शेतक-यांना हेक्टरी एक लाख मदत द्या पीक कर्ज वीज बील माफ करा, ना चोर हूँ ना चौकीदार हूँ साहब मैं तो चौकीदार हूँ, पनिश द कलप्रिटस् गिव्ह अवर डिपॉझिट अशा विविध घोषणा देणारे फलक निदर्शनकर्त्यांच्या हातात होते. या निदर्शनामध्ये काँग्रेसची महिला आघाडीही सामील झाली होती. काही काँग्रेस कार्यकर्ते पदवीधर, डॉक्टर अशी विविध रूपं घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते.

Comment here