Rain

आज सकाळी पावसाची जोरदार हजेरी

आज सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पहाटे साडेपाच पासून जवळपास साडेआठ पर्यंत पाऊस झाला. या तीन तासात जवळपास ६० मिलीमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली. सुरूवातीला जोरदार कोसळणा-या पावसाचा जोर नंतर काहीसा मंदावला. या पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळं सकाळी चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. अचानक पाऊस आल्यानं नंतर मात्र वातावरणात काहीसा गारवा आला होता.

Comment here