TMC

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी परिषद युनिट म्हणून मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक

तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथे झालेल्या २८व्या द्विवार्षिक राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी परिषद युनिट म्हणून ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. ट्रेंड नर्सेस असोसिएशनच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा अमिता देवधर आणि राष्ट्रीय कौन्सिलच्या सदस्या ज्योत्स्ना पंडीत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजारांचं पारितोषिक देऊन संस्थेला गौरवण्यात आलं. संस्थेच्या विद्यार्थी परिषदेनं गेल्या ५ वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हे पारितोषिक देण्यात आलं आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ही २८वी द्विवार्षिक राष्ट्रीय विद्यार्थिनी परिषद संपन्न झाली. १८ राज्यातून १४०० विद्यार्थीनी आणि शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. ठाण्यात झालेल्या २८व्या द्विवार्षिक राज्यस्तरीय विद्यार्थिनी परिषदेत प्रथम क्रमांकाने गौरवलेल्या ७६ विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य स्टुडंट नर्सेस असोसिएशनचे प्रतिनिधीत्व केले. परिचारिका विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवल्याबद्दल राज्याच्या विद्यार्थिनी परिषद शाखेलाही सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी शाखा हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन यावेळी गौरवण्यात आलं.

Comment here