crime

सीसीटीव्ही यंत्रणेचं साहित्य पुरवणा-या एजन्सीची सेल्समननं कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचं उघड

सीसीटीव्ही यंत्रणेचं साहित्य पुरवणा-या ठाण्यातील एजन्सीची एका सेल्समननं कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. ठाण्यातील टेंभीनाक्यावर खुशी एन्टरप्रायझेस ही सीसीटीव्ही यंत्रणेसाठी लागणा-या साहित्याचा पुरवठा करणारी एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये भाईंदर येथील गिरीराज जोशी हा भामटा सेल्समन म्हणून नोकरीवर मे महिन्यात रूजू झाला. काही दिवसातच या भामट्यानं भाईंदर येथील रॉयल टेक एन्टरप्रायझेसच्या उमंग त्रिवेदी यांच्याशी संगनमत करून कमिशनच्या बदल्यात काही एजन्सीचे लेटरहेड मिळवले. त्याद्वारे खुशी एन्टरप्रायझेसच्या व्यवस्थापकांचा विश्वास संपादन करत लाखो रूपयांचा माल या एजन्सीला दिल्याचं भासवत त्याची परस्पर विक्री केली. जोशी-त्रिवेदी या जोडगोळीनं इतर एजन्सीजच्या नावे खुशी एन्टरप्रायझेसची १ कोटी ३७ लाख रूपयांची फसवणूक केली. पैसे मिळत नसल्यामुळं खुशी एजन्सीचे व्यवस्थापक जयदत्त पाटील यांनी जोशी याच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं देत त्यानं कामावर येण्याचं बंद केल्यानं पाटील यांनी जोशी विरोधात पोलीसांकडे तक्रार नोंदवली आहे.

Comment here