TMC

महापालिकेच्या तिस-या दिवशीच्या कारवाईत १६७ हातगाड्या, २९ टप-या, १२ फेरीवाले, १२ पोस्टर्स, २३ बॅनर्स आणि ३२१ पदपथांवरील बांधकामं जमिनदोस्त

ठाणे महापालिकेची अतिक्रमणा विरोधातील कारवाई तिस-या दिवशीही सुरूच असून या कारवाईमुळे काही पदपथांवरून चालणं सुसह्य झालं आहे. महापालिकेची पदपथ अतिक्रमण मुक्त अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्स वरील कारवाई तिस-या दिवशीही सुरूच होती. तिस-या दिवशीच्या कारवाईत १६७ हातगाड्या, २९ टप-या, १२ फेरीवाले, १२ पोस्टर्स, २३ बॅनर्स आणि ३२१ पदपथांवरील बांधकामं जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ४३ हातगाड्या, १२ पोस्टर्स, २३ पदपथांवरील अतिक्रमणं, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात १८ हातगाड्या, २७ पदपथांवरील अतिक्रमणं, माजिवडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ४ पदपथांवरील अतिक्रमणं, २१ हातगाड्या, ३ बॅनर्स, वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ५३ पदपथांवरील अतिक्रमणं, ७ हातगाड्या, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ५५ पदपथांवरील अतिक्रमणं, १६ हातगाड्या, २ टप-या, कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये २५ पदपथांवरील अतिक्रमणं, १३ हातगाड्या, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये २७ पदपथांवरील अतिक्रमणं, १८ हातगाड्या, उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ११ हातगाड्या, २६ पदपथांवरील अतिक्रमणं तर मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ३२ हातगाड्या, १४ लाकडी बाकडी, १२ लोखंडी स्टँड, ११ पानटप-या, ६ ऊसाच्या रसाच्या गाड्या, ६ कोंबडी पिंजरे, ८ बॅनर्स, १ सिलेंडर, ४ स्टील काऊंटर, २२ ठेले आणि ३७ वेदरशेड निष्कासित करण्यात आल्या.

Comment here