पाचव्या माय ठाणे फेस्टीवलचं आयोजन

ब्लू एंटरटेनमेंट आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं पाचव्या माय ठाणे फेस्टीवलचं आयोजन १४ आणि १५ डिसेंबरला करण्यात आलं आहे. यामध्ये विविध भाषेतील लघुचित्रपटांचा समावेश होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठल्याही भाषेचे, विषयाचे किंवा प्रकाराचे बंधन नसून २०१० नंतर बनवलेला कुठल्याही भाषेतील लघुचित्रपट प्रवेशासाठी पात्र असेल. इंग्रजी, हिंदी आणि मराठी सोडून इतर भाषेतील चित्रपटांना सबटायटल्स असणे अनिवार्य आहे. लघुचित्रपटाची लांबी किमान १ मिनिट ते जास्तीत जास्त ५९ मिनिटं असावीत. या फेस्टीवलमध्ये विविध प्रकारची ५० हून अधिक पारितोषिकं आणि ज्युरींची विशेष पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. जाहिरात, लघुचित्रपट, माहितीपट, प्री-वेडींग शूट, वेडींग शूट, मोबाईल व्हीडीओ, पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन, व्हीडीओ साँग, वेब मालिका यापैकी कोणत्याही प्रकारात इच्छुक भाग घेऊ शकतात. प्रवेशाची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर पर्यंत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ब्लू एन्टरटेमेंट डॉट ईन या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असून ७३०४३७८२२५ या क्रमांकावर संपर्क साधूनही सहभाग नोंदवता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading