टोरंट हटाव कृती समितीतर्फे विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात मोर्चा

टोरंट हटाव कृती समितीतर्फे कळवा-मुंब्रा मधील विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
कळवा-मुंब्रा विभागातील महावितरणचं खाजगीकरण करण्यात आलं आहे आणि येथील ठेका टोरंट कंपनीला देण्यात आला आहे. कळवा-मुंब्राकरांचा टोरंट कंपनीला विजेचं वितरण आणि वसुलीचं काम देण्यास विरोध आहे. यावर अनेक आंदोलनं झाली. माजी उर्जामंत्री, पालकमंत्री, प्रशासकीय अधिका-यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गा-हाणं गाऊनही काहीच उपयोग झालेला नाही. ३१ जुलैच्या बैठकीत माजी उर्जामंत्र्यांनी या ठेक्याला स्थगिती दिल्याचं तोंडी सांगितलं होतं आणि या ठेक्याविषयी नवीन सरकार निर्णय घेईल असं सांगण्यात आलं होतं पण त्यानंतरही कळवा-मुंब्रा परिसरात टोरंट कंपनीचे कामगार आणि अधिकारी फिरत आहेत. त्यांनी पडले गावात काही कामही सुरू केल्यानं त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं या कंपनीला विरोध दर्शवण्यासाठी आणि हा ठेका रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा अशी टोरंट हटाव कृती समितीची मागणी आहे. मोर्चेक-यांनी आपल्या मागण्यांचं एक निवेदन यावेळी जिल्हाधिका-यांना दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading