शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा

ठाण्यात पुढील दोन-तीन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणा-या पाणी प्रकल्प केंद्राची विद्युत वाहिनी तुटल्यानं पंपिंग यंत्रणा बंद पडल्या होत्या. त्यामुळं ठाणे शहराचा पाणी पुरवठाही ठप्प झाला होता. तुटलेली ही विद्युत वाहिनी दुरूस्त झाल्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा पूर्ववत झाला. स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा होतो. काल सकाळी टेमघर पाणी प्रकल्प केंद्राला पाणी पुरवठा करणारी टोरंटो कंपनीची विद्युत वाहिनी तुटली. त्यामुळं वीज प्रवाह ठप्प झाला. पर्यायानं पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला. दुपारनंतर ही विद्युत वाहिनी दुरूस्त झाली. त्यानंतर शहरातील पाणी पुरवठा टप्प्याटप्प्यानं पूर्ववत करण्यात आला. त्यामुळं पुढील दोन-तीन दिवस शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading