गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

गुंतवणुकीवर जादा व्याजाचं आमिष दाखवून ठाणे शहर आणि परिसरातील अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांसह ५ जणांविरूध्द नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुडविनच्या संचालकांनी भिशी आणि ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून अनेकांची फसवणूक केली. मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणुकीचे ठरल्याप्रमाणे पैसे न देता पलायन केलं म्हणून अनेक गुंतवणुकदारांनी त्यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरून गुडविन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, मोहन, सुधीरकुमार आणि इतर ११ जणांवर नौपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाचप्रकारे डोंबिवली, अंबरनाथ आदी ठिकाणीही गुडविनच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading