भुकेलेल्यांना अन्न मिळावं यासाठी हॅप्पी फ्रिजचा ठाण्यात शुभारंभ

भुकलेल्यांना अन्न मिळावं म्हणून हॅप्पी फ्रीज ही संकल्पना ठाण्यात राबवण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर या कल्पनेचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आला. ठाण्यामध्ये तीन पेट्रोल पंप परिसरात एक फ्रीज ठेवण्यात आला असून आपल्याकडे उरलेलं चांगलं अन्न हे या फ्रीजमध्ये ठेवता येणार आहे. भुकेले आणि गरजू लोकं या फ्रीजमधून त्यांना हवं असलेलं अन्न घेऊ शकतात अशी सरळ आणि साधी कल्पना यामागे आहे. घरातलं उरलेलं अन्न वाया जाण्यापेक्षा ते गरजूंच्या पोटी लागलं तर त्याचा समाजाला फायदा होऊ शकतो. पार्टी आणि लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जातं. असं अन्न ते या फ्रीजमध्ये देऊन गरजूंच्या मदतीला येऊ शकतात. या कल्पनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ठाण्याच्या विविध भागातही असे फ्रीज ठेवण्याची कल्पना आहे. हा प्रकल्प फीड इंडिया या झोमॅटो कंपनीचा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading