थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू सहभागी होत असून ठाण्याचं लौकिक जागतिक पातळीवर हे स्पर्धक करतील अशी आशा स्टारफीश फौंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आली. २ आणि ३ नोव्हेंबरला थायलंडमधील क्राबी येथे जागतिक ओशियनमॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ३० देशांचे ८०० जलतरण पटू सहभागी होणार आहेत. आजवर विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये स्टारफीशच्या जलतरण पटूंनी सहभागी घेऊन ठाण्याचा नावलौकीक वाढवला आहे. या स्पर्धेत १० किलोमीटर स्पर्धेसाठी अर्चित साली, २ किलोमीटर स्पर्धेसाठी चिरायु चऊलकर आणि विजय ओजाळे तर १ किलोमीटर स्पर्धेसाठी आयुषी आखाडे, युवराज राव, फ्रेया शहा, राज उपलेटवाला, विराट ठक्कर, तृणांश गंद्रे हे स्पर्धक सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading