एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांच्यावर ८९ हजार ३०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांना १ लाख १३ हजार ४९७ तर संजय घाडीगावकर यांना २४ हजार १९७ मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांना १६ हजार ९१९ तर वंचित बहुजन आघाडीच्या उन्मेश बागवे यांना ५ हजार ९२५ मतं मिळाली. या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहज विजय झाला. त्यांना काँग्रेसच्या संजय घाडीगावकर आणि उन्मेष बागवे यांनी मोठा विरोध केला होता. समूह विकास योजना आणि पालकमंत्र्यांच्या इतर महत्वाकांक्षी योजनांवर जोरदार टीका केली. मात्र या कशाचाही उपयोग झाला नाही आणि कोणतंही परिवर्तन न घडता एकनाथ शिंदे हे या मतदारसंघातून नेहमीप्रमाणे सहज निवडून आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading