भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर २० हजार २५८ मतांनी विजयी

ठाणे विधानसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर २० हजार २५८ मतांनी विजयी झाले आहेत. आज सकाळी मतमोजणी झाली. या मतमोजणीत काही वेळा केळकर यांची आघाडी घटली होती. मात्र अखेर केळकर यांनी बाजी मारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनीही संजय केळकर यांना चांगली लढत दिली. केळकर यांची घटलेली आघाडी हा एकप्रकारे धोक्याचा इशाराच मानला जातो. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर नोटाचा वापर केला असून जवळपास ४ हजाराहून अधिक मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading