मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे वाचन कट्ट्याचा शुभारंभ

मेंदू हा सतत दक्ष असतो असे नसून तो अनेकदा फसू शकतो. नसलेल्या गोष्टीही तो कधी दाखवतो आणि त्या आहेत असा आपल्याला भास निर्माण होतो अशा शब्दात सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या अशा त-हेवाईक वागणुकीवर प्रकाश टाकला. मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वाचन कट्ट्याच्या शुभारंभ कार्यक्रमात सुप्रसिध्द विज्ञान कथालेखक सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या अशा त-हेवाईक वागणुकीवर प्रकाश टाकला. २० लाख वर्षांपूर्वी मानव अस्तित्वात आला असला तरी मानवी मेंदूचा विकास हा गेल्या ५० वर्षात अधिक झाला असं त्यांनी सांगितलं. मानवी मेंदूमध्ये दोन यंत्रणा काम करत असतात. क्षणिक निर्णय आणि विचारपूर्वक सावकाश निर्णय. संकटातून मानवाचे रक्षण करणे हेच मेंदूचे मुख्य कार्य असते. मेंदूतील आठवणी या चिरेबंदी असतात असं सांगत त्यांनी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करत मेंदूच्या अनेक चकित करणा-या रहस्यांवर प्रकाश टाकला. मराठी ग्रंथसंग्रहालयानं लेखक आणि वाचक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी दर महिन्याला वाचन कट्टा हा कार्यक्रम सुरू केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading